आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेत होते सगळेच एकत्र, विधानसभेत प्रत्येक पक्ष पाहतोय एकहाती सत्तेचे स्वप्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी 2014 हे वर्ष दोन मुख्य मुद्यांमुळे चर्चेत राहिले.त्यामध्ये एक होता लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील युती-आघाडी मैत्री तुटल्याची चर्चा. लोकसभा निवडणूकीच्या वेळी कॉँग्रेसला मागील 15 वर्षांपासून कंटाळलेल्या सामान्य मतदाराते एक हाक देत सत्तेतून आऊट केले हे सर्वांनी पाहिले. लोकसभेच्या निवडणूका संपन्न होण्याआधी एक प्रकारची बदलाची लाट निर्माण झाल्याचे क्षणो-क्षणी जाणवत होते. विशेष म्हणजे या लाटेमध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी आपपला मोलाचा वाटा दिला.त्याचे यश भारतासहित सगळ्याच देशांनी बघितले. नक्कीच ही मतदारांची एक हाक लक्षात घेत देशातील सर्वच राजकारण्यांना मतदर जे ठरवतात करुन दाखवतात याचा अनुभव आला असेल.
लोकसभेच्या काळात जनतेकडून स्वत:हून भारतीय जनता पक्षाचा आपापल्या पद्धतीने प्रचार केला जात होता. यामध्ये सोशल मीडियाने मोलाचा वाटा उचलला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या काळात भारतीय जनता पक्षातर्फे तयार करण्यात आलेल्या अनेक जाहिराती लहाग्यांच्या देखील तोंडातून ऐकण्यास मिळत होत्या. या काळातील एकंदरीत राजकीय चित्र पाहता ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्रात होणा-या विधासभेच्या निवडणुकांमध्ये देखील सेना-भाजप सत्तेत येणार हेच वाटत होते परंतु ऐन निवडणुकांच्या तोंडावर सेना-भाजपची युती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने लोकसभेच्या वेळी निर्माण झालेले सेना-भाजप युतीच्या सत्तेचे महाराष्ट्रातील स्वप्न भंगले असेच म्हणता येईल. ऐन तोंडावर प्रमुख पक्षांची मैत्री तुटल्याने सामान्य मतदारच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

पुढील स्लाईडवर वाचा लोकसभा-विधानसभेतील प्रचारातील फरक -