आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis NCP Shivsena And MNS Alliance In Maharashtra ?

विश्लेषणः निवडणुकीनंतर राष्ट्रवादी-सेना-मनसेची होईल आघाडी? जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी होणा-या विधानसभेच्या निवडणूकांना अवघे 8 दिवस बाकी राहिले आहेत. जास्तीत जास्त मतदारांचे मत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील नेते मंडळी प्रचार सभांमध्ये रंग भरताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील युती-आघाडी तुटल्याने महाराष्ट्रात नेमके कोणाचे सरकार येणार याबद्दलची चर्चा रंगत आहे. सद्यस्थिती बघितली तर कॉंग्रेसचे परडे कमकुवत होत असल्याची स्थिती आहे तर दुसरीकडे भाजपची स्थिती मजबूत आहे. पण शिवसेनेशी गेल्या 25 वर्षांपासून असलेली युती तोडून भाजपने राजकीय अपरिपक्वता सिद्ध केली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि मनसे जवळ आल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेना आणि मनसेसोबत आघाडी केली तर आश्चर्य वाटू नये. अशी आघाडी दिसून आली तर महाराष्ट्रातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदललेली दिसून येतील.
दुसरीकडे नितीन गडकरी आणि शरद पवार यांनी दिलेल्या संकेतानुसार आघाडी-युती पुन्हा होऊन जुनेच राजकारण दिसण्याची शक्यता आहे. असे झाले तर ही जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकण्याचा प्रकार होईल. पण राजकारणात काहीही सांगता येत नाही. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी मैत्री असल्याचे देखील बोलले जात आहे. पण शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे, की कोणत्याही सांप्रदायिक पक्षासोबत आम्ही आघाडी करणार नाही. पवारांच्या वक्तव्यात केवढा दम आहे, हे आत्ताच सांगणे तसे अवघड आहे. कारण कॉंग्रेसवर टीका करुन महाराष्ट्रात वेगळा घरोबा करणाऱ्या पवारांनी चक्क १५ वर्षे त्यांच्यासोबत घालवली आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे युती कशी शक्य आहे....