आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anil Chaudhari News In Marathi, Maharashtra Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळातील ११ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव; अनिल चौधरींना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत प्रांताधिकारी कार्यालयात दाखल हद्दपारीच्या ११ प्रस्तावांची चौकशी पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे सुरू झाली आहे. त्यात माजी आमदार संतोष चौधरी अनिल चौधरी यांचाही समावेश असून, दोघांना २५ सप्टेंबरपर्यंत खुलासा सादर करण्याची नोटीस काढण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी वाजता पोलिसांनी अनिल चौधरींना ही नोटीस बजावली.

शहरातील विघ्न‘संतोषी’ लोकांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार करण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रस्ताव तयार केले आहेत. बाजारपेठ आणि शहर पोलिसांनी त्यांच्याकडील प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवले होते. अधीक्षक कार्यालयातून हे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले असून, प्रांताधिकाऱ्यांनी भुसावळ येथील ११ प्रस्ताव चोकशीसाठी पोलिस उपअधीक्षकांकडे पाठवले आहेत. त्या अनुषंगाने प्रस्तावात नावे असलेल्या ११ जणांना पोलिस उपअधीक्षक पवार यांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यात प्रत्येकाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तारखा दिल्या असून, चौधरीबंधूंना २५ सप्टेंबर ही तारीख दिली आहे.
चौकशी अहवाल प्रांतांना : उपअधीक्षक सर्व ११ जणांची चौकशी करून प्रांताधिकार्‍यांकडे सविस्तर अहवाल पाठवतील. प्रांताधिकारी या अहवालाचा अभ्यास करून पुन्हा संबंधितांची बाजू ऐकून घेतील त्यानंतरच हद्दपारीचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
यांचे हद्दपारीचे प्रस्ताव: पोलिस उपअधीक्षकांकडे आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांत माजी आमदार संतोष चौधरी, अनिल चौधरी, इमरान शेख अजीज रहेमान, धीरज ऊर्फ भुऱ्या किशोर बारसे, युवराज कडू होंडाळे, शम्मी चावरिया, खुशाल ऊर्फ बंटी गजानन बोरसे, तस्लीम शेख सलीम, शेख हमीद शेख समशोद्दीन, हरिप्रसाद अग्रवाल सिकंदरअली बशारतअली सय्यद यांचा समावेश आहे.

अनिल चौधरींना नोटीस
मंगळवारी दुपारी वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील हवालदार राजू साळुंखे, बंटी सैंदाणे दीपक शिरसाठ यांनी ‘हद्दपारी प्रस्तावाबाबत २५ सप्टेंबरला म्हणणे सादर करावे’ या आशयाची नोटीस अनिल चौधरींना बजावली. तसेच संतोष चौधरी यांनासुद्धा तशी नोटीस देण्यात येणार आहे. त्यांची भेट झाल्यास त्यांच्या घराला नोटीस चिकटवली जाऊ शकते. कायद्यात तशी तरतूद आहे, असे सूत्रांनी सांगितले.