आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅप डेव्हलपर्सही सुसाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्ट्यापासून किचनपर्यंतसंचार असलेल्या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून मतदारांच्या मनात प्रभाव निर्माण करण्याचे माध्यम म्हणून अ‍ॅप्लिकेशन्सकडे पाहिले जाते आहे. म्हणूनच दसरा-दिवाळीच्या तोंडावर आलेली विधानसभेची निवडणूक अ‍ॅप्लिकेशन्स डेव्हलपर्ससाठीही मोठी संधी ठरते आहे. लाखोच्या संख्येने उपलब्ध असलेल्या या बाजारात हवे तसे एक अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी ५० हजार ते लाखांपर्यंतची पॅकेजेस उपलब्ध आहेत. तासाला सरासरी दोनशे रुपये आकारल्या जाणाऱ्या या जगतात, डेव्हलपर्स म्हणून तरुणाईचाच प्रभाव आहे. एखादे अ‍ॅप्लिकेशन तयार करायचे असल्यास इच्छुक उमेदवाराकडून त्याच्या मतदारसंघाच्या भौगोलिक माहितीसह मतदार संख्या, उमेदवाराची आश्वासने, विकासकामे, त्याचे फोटो, उमेदवाराचे प्रोफाइल अशी सविस्तर माहिती घेतली जाते.