आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सगळ्यात मोठा स्लम एरिया, झोपडीची किंमत कोट्यवधींच्या घरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या 'वोट बॅंक'चा आम्ही आपल्याला परिचय देत आहोत.
मायानगरी समजली जाणार्‍या मुंबईत आशिया खंडातील सगळ्यात मोठा स्लम एरिया (झोपडपट्टी) आहे. 'धारावी' असे या परिसराचे नाव असून हा परिसर 557 एकरमध्ये विस्तारित झाला आहे. जवळपास एक मिलियन लोकसंख्या असलेला हा भाग पश्चिम माहिम आणि पूर्व सायन या भागात विस्तारला आहे.

धारावीत मुख्यतः अन्य राज्यातून स्थलांतरीत झालेले लोक राहातात. परंतु आता ते मुंबईकर झाले आहे, असेच म्हणावे लागेल. सन 1880 मध्ये अर्थात ब्रिटिशांच्या काळात 'धारावी' अस्तित्त्वात आली आहे. सद्यस्थितीत धारावीची अवस्था फारच वाईट असली तरी या भागाला अलिकडच्या काळात अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
धारावीतील एका झोपडीची किंमत एक कोटी रुपयांच्या घरात आहे. याचा अर्थ असता की, येथील एक स्क्वेअर फूट जागेची किमत 25,000 ते 30,000 पोहोचली आहे. धारावीतील झोपड्या अगदी एकमेकांना खेटून आहेत. त्यामुळे या भागात मोकळा परिसर शोधूनही सापडत नाही.

चामड्याच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध...
धारावीत राहाणारे बहुतांश लोक राहात्या घरातच लहान-मोठे व्यवसाय करतात. यात प्रामुख्याने चामडे, टेक्सटाइलचा व्यवसायाचा समावेश आहे. एका सिंगल रुम फॅक्टरीमध्ये तयार झालेला माल एक्सपोर्ट देखील केला जातो, हे धारावीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

प्रत्येक पक्षाची 'वोट बॅक'
देशाला स्वातंत्र म‍िळून आज 67 वर्षे उलटली असूनही धारावीचे रुपडे मात्र बदलले नाही. धारावीची ओळख ही अजूनही जगाच्या नकाशावर झोपडपट्टी म्हणूनच आहे. परंतु, प्रत्येक राजकीय पक्ष धारावीला आपापली वोट बॅंक समजतो. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या निवडून आल्या होत्या.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, आशियातील सगळ्यात मोठा स्लम एरियाची छायाचित्रे...