आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांना लुबाडणा-याच्या विरोधात निवडणूक लढणार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गाडे यांचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीगोंदे हा कारखानदारांचा तालुका आहे. शेतक-यांच्या शेअर्सच्या पैशातून काहींनी सहकारी, तर काहींनी खासगी कारखाने उभारले. शेतक-यांच्या जीवावर कारखानदार होत शेतक-यांच्याच उसाच्या मापात पाप करण्याचे उद्योग कारखानदार करत आहेत. शेतक-यांना लुबाडणा-याविरोधात मी निवडणूक लढवणार आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी जाहीर केले.
वाळकी, चिचोंडी पाटील गटातील प्रचारदौऱ्यात ते बोलत होते. शेतकरी मोठ्या श्रमाने उसाचे पीक घेतात. प्रसंगी उसनवारी करून खते घेतात. उसाच्या पैशांवर त्यांची स्वप्ने आधारलेली असतात. पण त्यांच्या उसाच्या मापात कारखानदार पाप करत काटा मारतात. या काटा मारणाऱ्यांचा काटा काढण्याची वेळ आता आली आहे. त्यांची २० वर्षांपूर्वी परिस्थिती काय होती आणि आता काय आहे? हे पैसे यांना कोणत्या धंद्यातून मिळतात हे त्यांनी उघड करावे, म्हणजे जनतेलाही श्रीमंत होण्याचे मार्ग मिळतील.या अपप्रवृत्तींविरोधात निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार गाडे यांनी व्यक्त केला.

साकळाई उपसा योजना श्रीगोंदे व नगर तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेत कोळगाव, मांडवगण, वाळकी गटातील गावांचाच समावेश आहे. या योजनेला याच पुढाऱ्यांनी विरोध केला. आपण या योजनेसाठी मुंबईला मोर्चा काढला. या कारखानदारांनी या योजनेसाठी काय केले याचा जाब जिरायत पट्ट्यातील जनतेने आता विचारायला हवा, असे गाडे म्हणाले.