आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातला एक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार; आमदार प्रशांत बंब भारतीय जनता पक्षात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाला राज्यात वाढवून मिळालेल्या विधानसभेच्या ७ जागांमध्ये एक जागा गंगापूरची असेल आणि शिवसेनेला ती सोडावी लागेल, असे संकेत विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या भाजप प्रवेशामुळे मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेतर्फे त्या मतदारसंघात इच्छुक असलेल्यांची पुढची भूमिका काय असेल, हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत गंगापूर मतदारसंघ शिवसेना सोडणार नाही, असे सांगत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.
सात वर्षांपूर्वी भाजपमधून बाहेर पडलेले गंगापूरचे आमदार प्रशांत बंब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही परतले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि ओम माथूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मागच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या अण्णासाहेब माने यांचा पराभव करून अपक्ष निवडून आले होते. युतीच्या निर्णयानंतर हा प्रवेश झालेला असल्यामुळे त्यांच्यासाठी भाजप गंगापूर मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेईल, याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील जागांचे संख्याबळ घटणार आहे.
युतील अंतर्गत संघर्ष वाचा पुढील स्‍लाईडवर...