आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पँथर नेते गंगाधर गाडे यांना औरंगाबाद पश्चिममधून ओवेसीच्‍या एमआयएमची उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पँथर्स रिपब्लिकनचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्याशी एमआयएमने आघाडी केली आहे. मात्र त्यांच्या पक्षाची अधिकृत नोंदणी नसल्यामुळे ते एमआयएमच्या निवडणूक चिन्हावर औरंगाबाद पश्चिममधून निवडणूक लढवतील, अशी माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपसोबत सूत न जमल्यामुळे गाडे यांनी सोमवारी हैदराबाद येथे एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताची मंगळवारी शहरात चर्चा होती. पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना प्रवेश नव्हे तर आपण आघाडी केल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी केली असेल तर एमआयएमचे निवडणूक चिन्ह (पतंग) घेणार का.. या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. कुरेशी यांनी मात्र सावरत आमची आघाडीच असून गाडेंच्या पक्षाची नोंद नसल्यामुळे त्यांना एमआयएमने उमेदवारी दिल्याचे सांगितले.चिन्ह कोणतेही असो, आपल्याला काहीच फरक पडत नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी विचार, आंबेडकरी चळवळीला सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. बहुजन, दलित आणि मुस्लिमांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने कायम षड्यंत्र केले. त्यामुळे आम्ही एमआयएमसोबत आघाडी केल्याचे गाडे यांनी म्हटले. दरम्यान, गुरुवारी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. कुरेशी, मुकुंद सोनवणे, पंडित नवगिरे, बंडू कांबळे, किशोर जाधव, अबू बकर रहबर, सचिन बोरडे, मनोज वाहूळ, अनिल सदाशिवे, माँटेकसिंग आदींची या वेळी उपस्थिती होती.
आणखी कोण आहेत एमआयएमचे उमेदावार जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर