आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीची तर युतीत प्रचाराची मोर्चेबांधणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सर्वधर्म-जाती, संप्रदायांचे मतदार आहेत. मागील (२००९) निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रभान पारखे यांचा शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी १४, २११ मतांनी पराभव केला होता.
त्यामुळे यंदाही शिवसेनेची उमेदवारी शिरसाट यांना नक्की झाली आहे. पण आघाडीचा उमेदवार अद्याप ठरला नसून काँग्रेसचे ३४ जण उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेनेत सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मित्रपक्षांची संख्या वाढलेली असल्यामुळे महायुतीतील अन्य नेत्यांचा प्रभावही शिरसाट यांच्या पथ्यावर पडणार आहे, तरीही त्यांना वाटते तेवढी ही लढत सोपी राहणार नाही. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे शहरात मध्य, पूर्व आणि पश्चिम असे तीन मतदारसंघ निर्माण झाले.
पुनर्रचनेनंतर अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात या वेळी दुसऱ्यांदा निवडणूक होत आहे. दलित, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीयांची मतदारसंघात कमी अधिक फरकाने सारखीच संख्या आहे. शिरसाट यांनी मनपाच्या राजकारणातच यशस्वी लोकप्रतिनिधी होण्याचे धडे गिरवले आहेत. स्थायी समितीचे सभापती, सभागृह नेता, नगरसेवक म्हणून जवळपास पंधरा वर्षे त्यांनी मनपात विविध विकासकामांत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.
शिवसेनेशी निष्ठा आणि पंधरा वर्षांचा अनुभव या जोरावरच त्यांना गतवेळी उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसनेही त्या वेळी त्यांच्या विरोधात पक्षनिष्ठा जोपासणाऱ्या चंद्रभान पारखे यांना रिंगणात उतरवले. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय असल्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात होते. अपक्ष दलित उमेदवारांमुळे पारखे यांना मिळू शकली असती अशी मते त्या वेळी विभागली गेली.
शिरसाट यांची मतदारसंघावर पकड कायम
शिरसाट यांनी पुन्हा विजय मिळवण्यासाठी मागील चार वर्षांपासून मतदारसंघात काम सुरू केल्याचा दावा केला आहे. संघटनात्मक पातळीवर त्यांनी मतदारसंघात शिवसेना शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे नेटवर्क उभे केले. पैठण रोडकडून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३४ कोटीचे काम करून विकासाची चुणूक दाखवली. शिवाय मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार निधी खर्च करून समाजमंदिर, पाणंद रस्ते, सभागृहांची कामे मार्गी लावली. अर्थात काही भागांकडे त्यांचा अपेक्षित संपर्क झालेला नाही.

वॉर्डांसह ग्रामीण भागाचा समावेश
गारखेडा, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, तिसगाव, भावसिंगपुरा, भीमनगगर, वडगाव कोल्हाटी, नंदनवन कॉलनी, पडेगाव, बजाजनगर, बुद्धनगर, छावणी, कांचनवाडी, रेल्वेस्टेशन, पदमपुरा, कोकणवाडी, उस्मानपुरा, एकनाथनगर, कबीरनगर, क्रांतीनगर, इंिदरानगर, शहानूरवाडी, रांजणगाव, कर्णपुरा, म्हाडा कॉलनी, समाधान कॉलनी, केसरसिंगपुरा, संगीता कॉलनी, बन्सीलालनगर, जालाननगर, वेदांतनगर, सातारा तांडा, गेवराई तांडा, सिल्कमिल कॉलनी, शिरसाळा तांडा, सिंदोन-भिंदोन या भागांसह पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागही येतो.
पुढील स्‍लाईडवर वाचा कोण आहे पश्चिममधून प्रतिस्‍पर्धी