आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव मतदारसंघातील गावेच ठरणार निर्णायक, बार्शी, माळशिरस वगळता सर्वच मतदारसंघांना जोडली गावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना केली. त्यानुसार जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ तयार झाले. यामध्ये मतदारसंघाचे अस्तित्व निर्माण झाले तर काही मतदारसंघाचे अस्तित्व नाहीसे झाले. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 2009 च्या निवडणुकीत इतर तालुक्यातील जोडलेल्या गावांतील मतदारांनी अनेक उमेदवारांचा आमदारकीच्या स्वप्नांचा चुराडा केला. अक्कलकोट व पंढरपूरमध्ये विद्यमान मंत्र्यांना पराभूत करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मागील विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना या वाढीव गावांवर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघ
दक्षिण सोलापूर मतदारसंघास दक्षिणमधील 56 गावांसह उत्तर तालुक्यातील 10 गावे तर शहरातील 12 वॉर्ड जोडण्यात आले आहेत. पहिल्यांदाच काँग्रेसकडून संधी मिळालेले दिलीप माने यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार रतिकांत पाटील यांना पराभूत केले. या विजयात शहरातील भागाचे मोठे योगदान राहिले.
करमाळा मतदारसंघ
करमाळा मतदारसंघास माढा मतदारसंघातील कुर्डुवाडी नगरपरिषदेसह 38 गावे जोडण्यात आली आहेत. करमाळा व माढा दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असल्याने माढा मतदारसंघातील मतांमुळे श्यामल बागल यांचा विजय सोपा झाला. त्यांनी विद्यमान आमदार जयवंत जगताप यांचा पराभव केला.
माढा मतदारसंघ
गावांपैकी पंढरपूर तालुक्यातील 42 माळशिरसमधील 14 माढा मतदारसंघास पंढरपूर तालुक्यातील 42 तर माळशिरस तालुक्यातील 14 गावे जोडण्यात आली आहेत. माढा, माळशिरस व पंढरपूर हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे आमदार बबनराव शिंदे यांच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसून आले. यातही वाढीव गावांचे योगदान राहिले.
अक्कलकोट विधानसभा
कर्नाटक व मराठवाड्याच्या सीमेवरील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, कुंभारी जिल्हा परिषद गटातील 34 गावे जोडण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत सिद्रामप्पा पाटील यांनी काँग्रेसचे विद्यमान मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दारुण पराभव केला. यामध्ये दक्षिण तालुक्यातील जोडलेल्या 34 गावांची मते निर्णायक ठरली. मोहोळ मतदारसंघासही उत्तर तालुक्यातील 24 गावे जोडण्यात आली आहेत. आमदार लक्ष्मण ढोबळे यांना विजयी होण्यासाठी उत्तर तालुक्यातील ही मते खूपच मोलाची ठरली.

पंढरपूर मतदारसंघ
पंढरपूर मतदारसंघासाठी मंगळवेढा तालुक्यातील 36 गावे जोडली आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३६ गावांच्या मतावरच माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार विजयसिंह मोहिते यांचा पराभव करू शकले. यंदाची निवडणूकही पाण्याच्या प्रश्नावरच होणार असल्याने आमदार भारत भालके त्यास कसे सामोरे जाणार ? हे प्रत्यक्षात निवडणुकीत पाहावे लागेल.