आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य मतदारसंघात सहा जणांत रंगणार चुरस, जैस्वाल, तनवाणी, शेख, पाटील, वानखेडे, जलील यांच्यात लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, भाजपचे किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे एम. एम. शेख, राष्ट्रवादीचे विनोद पाटील, मनसेचे राजगौरव वानखेडे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात लढत होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस अर्ज मागे घेण्यासाठी आहेत. त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून तनवाणी, काँग्रेसकडून शेख व एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी अर्ज सादर केले आणि येथील लढतीचे चित्र समोर आले. तनवाणी हे भाजपचे उमेदवार असणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. शनिवारी त्यांना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली आणि समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अर्ज सादर केला. शेख हे एमआयएमच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आज त्यांना काँग्रेसने बी फॉर्म दिला. त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. पूर्वी जाहीर केल्यानुसार जलील यांनी एमआयएमचे उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली. वरील 6 जणांशिवाय अन्य 50 उमेदवार रिंगणात असून उर्वरित 44 पैकी किती जण मैदानातून माघार घेतात, हे बुधवारी स्पष्ट होईल. पूनमचंद बमणे, शिवनाथ राठी यांच्यासह इतर पक्ष, संघटनांचे उमेदवार नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.
माघार घेण्यासाठीच उडी
44 पैकी काही जणांनी माघार घेण्यासाठीच मैदानात उडी घेतल्याचे सांगण्यात येते. ज्या उमेदवाराला अपक्षांचा फटका बसेल, तो त्यांच्याशी बोलणी करेल आणि त्यानंतर ते माघार घेतील, असे सांगण्यात येते. लढतीचे खरे चित्र एक ऑक्टोबरलाच समोर येईल.