आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांच्या मिरवणुकीला कार्यकर्त्यांची मारामार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पूर्व मतदारसंघात शिवसेनेने महापौर कला ओझा यांना मैदानात उतरवले आहे. आज त्यांनी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरला. या मिरवणुकीला मात्र मनपातील पदाधिकारी व नगरसेवक आणि मोजके शिवसैनिक एवढीच गर्दी गोळा करता आली.
पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावे यांच्यावर गळ टाकून बसलेल्या शिवसेनेने महापौर कला ओझा यांना पक्षाची उमेदवारी दिली. मात्र, अतुल सावे यांचे नाव भाजपकडून निश्चित होण्यात वेळ लागत असल्याने शिवसेनेची चांगलीच अडचण झाली, तरीही आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने महापौर कला ओझा यांनी मिरवणूक काढत अर्ज दाखल केला. जयभवानीनगरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गजानन महाराज मंदिरापर्यंत निघालेल्या मिरवणुकीत मोजकेच लोक होते. सभागृह नेते किशोर नागरे, हुशारसिंग चव्हाण, सूर्यकांत जायभाये, वीरभद्र गादगे, गिरजाराम हाळनोर आणि मनपातील नगरसेवक व पदाधिकारी तसेच मोजके शिवसैनिक यांची ही मिरवणूक निघाली. गजानन महाराज चौकात मिरवणूक विसर्जित झाल्यावर महापौर ओझा थेट शासकीय तंत्रनिकेतनला दाखल झाल्या. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांचा अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधण्यासाठी त्या आधी तेथे दाखल झाल्या. दहा मिनिटांनी खासदार चंद्रकांत खैरे धूत हॉस्पिटलमधून थेट येथे आले. महापौरांसोबत जात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.