आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळा नांदगावकरांना शेवटच्या दिवशी तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेने तिसरी यादी जाहीर केली, यात गटनेते बाळा नांदगावकर यांच्यासह १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. स्वबळावर निवडणुकीत सामोरे जात असलेल्या मनसेने २८८ पैकी २३९ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. तिसर्‍या यादीतील उमेदवार : शिवडी- बाळा नांदगावकर, कारंजा - रणजी शेरशिंग जाधव, गंगापूर - बादशाह पटेल, बागलाण - बापू माळी, पालघर - जगन्नाथ वरठा, वसई - स्वप्नील नर, डोंबिवली - हरिश्चंद्र पाटील, दहीसह - डॉ. शुभा राऊळ, वडगाव शेरी- नारायण गलांडे, शिर्डी - शेखर बोराटे, लातूर शहर - शिवप्रसाद मालू, कोल्हापूर दक्षिण - राजू दिंडोर्ले, हातकणंगले - रणजीत भोसले, इचलकरंजी - मोहन माळवणकर, पलूस - कडेगाव - अंकुश पाटील यांचा समावेश आहे.