आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusaewal Ex MLA Santosh Chaudhari News In Marathi

भुसावळातील लाल दिवा विझणार, संतोष चौधरी यांचा सावकारेंना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- नगरसेविकेच्या घरी जाऊन भांडण करणार्‍यांचा लाल दिवा विधानसभा निवडणुकीत विझणार आहे, असा टोला राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री संजय सावकारेंना लगावला.

तेली समाज मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित मेळाव्यात संतोष चौधरी बोलत होते. ते म्हणाले की, शहरात तीन वर्षांत पक्षाची एकही नवीन शाखा उघडून फलक लागला नाही. त्यामागील कारण शहराध्यक्षपद राष्ट्रवादीचे अन‌् काम भाजपचे होते. पक्षाला त्याची जाणीव झाल्यानेच जबाबदार माणसाकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादीचा झेंडा मुक्ताईनगरातही फडकावून दाखवू. भुसावळ मतदारसंघातील उमेदवारीसंदर्भात पवारांकडून विचारणा होणे, ही अभिमानाची बाब आहे. या वेळी विजय अवसरमल, शहराध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगराध्यक्ष अख्तर पिंजारी आदी उपस्थित होते.