आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhusawal Vidhansabha Constituency, Maharashtra News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागे वळून पाहताना: सत्तेच्या सारिपाटात भुसावळात ‘लेवा पाटीदार’ किंगमेकर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या पटलावर सन १९६२पासून झालेल्या १२ निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांनी तब्बल नऊ वेळा बाजी मारली आहे. पालकमंत्री संजय सावकारे, माजी आमदार संतोष चौधरी आणि मो.यासीन बागवान यांच्या रूपाने केवळ तीन लेवा समाजाबाहेरील उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. मात्र, आरक्षणामुळे लेवा समाज सत्तेच्या सारिपाटावरून दूर झाला असला तरीदेखील अद्यापही किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे.

सध्या राजकारण जातींच्या संख्याबळावर होते, असे म्हटले जाते. मात्र, भुसावळ विधानसभा मतदारसंघाचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहता येथे सामाजिक मतदानावरच उमेदवार निवडून येतो. भुसावळ मतदारसंघात सन १९६२पासून तब्बल १२ वेळा विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. त्यात नऊ वेळा लेवा पाटीदार, तर तीन वेळा इतर समाजांच्या उमेदवारांनी बाजी मारली अाहे. लेवा पाटीदार समाजाचा हा अभेद्य गड सर्वप्रथम १९८०मध्ये झालेल्या निवडणुकीत आय काँग्रेसचे उमेदवार मो.यासीन बागवान यांनी भेदला.

कामगार नेते दगडू चौधरी (डी.के.चौधरी) यांचा त्या वेळी केवळ हजार ८६ मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी संतोष चौधरी यांनी सलग दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या दिलीप भोळे यांचा पराभव केला. चौधरी हे अल्पसंख्याक असलेल्या तेली समाजाचे असल्यावरही त्यांनी २७ हजार ७६६ मतांची आघाडी घेतली होती. या वेळी खऱ्या अर्थाने लेवा पाटीदार समाजाचा हा गड भेदला गेला. २००९च्या निवडणुकीत हा मतदारसंघ ‘अनुसूचित जाती’ या प्रवर्गासाठी राखीव झाला अन‌् संतोष चौधरींचे स्वीय सहायक असलेल्या संजय सावकारे यांना या निवडणुकीत यश मिळाले.

६५ हजार मतांचा पेटारा
लेवापाटीदार समाजाचे या मतदारसंघात ६५,३७२ मतदान आहे. त्यात एकूण मतदानापैकी ८० ते ९० टक्के मतदान एकगठ्ठा होते, असा इतिहास आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराकडे लेवा समाज त्याचा विजय नििश्चत मानला जातो. या वेळच्या निवडणुकीत अजूनपर्यंत एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केला नसला तरीदेखील स्थानिक उमेदवार हवा, असे संकेत लेवा समाजातून दिसतात. त्यामुळे आता लेवा समाज कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
असे राहिले पक्षीय वर्चस्व
भुसावळविधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या १२ निवडणुकांमध्ये तब्बल सहा वेळा काँग्रेस आिण काँग्रेस (आय) पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आिण शिवसेनेने प्रत्येकी दोन, तर एक वेळा जनता दलाने विजय मिळवला आहे. सध्या मात्र ही जागा काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तथािप, आता मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीयांचे प्रयत्न सुरू आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सन १९६१पासूनचे विजयी पराभूत उमेदवार