आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे-ठाकरे घराण्यातील नवी पीढी, वाचा- पंकजा आणि आदित्यमधील समान गुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/मुंबई- महाराष्ट्राच्या इतिहासात यंदाची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. तसेच यंदा प्रथमच सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उल्लेखनिय म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून दोन युवा नेत्यांचा उदय झाला आहे. त्यात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे.

दोन्ही युवा नेत्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील डावपेच खूप जवळून पाहिले आहेत.
दरम्यान, शिवसेना- भाजपमधील 25 वर्षे जुनी मैत्री तुटल्यामुळे दोन्ही पक्ष तीन शतकात पहिल्यादा आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही पक्षांकडे लागले आहे.

पंकजा पालवे-मुंडे (35)
पंकजा पालवे- मुंडे या केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेता गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. पंकजा परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मित निधनानंतर पंकजा यांनी नेतृत्त्व सांभाळले आहे. पंकजा यांच्यातील गांभीर्य, जनसमूहाला संबोधित आणि नियंत्रित करण्याची कला संपूर्ण देशाने यापूर्वी पाहिली आहे.

आदित्य उद्धव ठाकरे (24)
युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे शिवसेनेनेचे भावी नेता आहेत. यंदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे 'मिशन 150'च्या मुद्यावरून चर्चेत आले आहेत. शिवसेना आणि मनसेमधील वाद पाहाता आदित्य ठाकरे हे वडील आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकारणात मदत करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्यक्ष एकही निवडणूक लढवलेली नाही, तरी देखील त्यांनी आपली क्षमता संपूर्ण महाराष्‍ट्राला दाखवून दिली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पंकजा V/S आदित्यमधील चार समान गुण...