आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp Candidate Sonba Musale To Disqualify For Maharashtra State Assembly Election Polls, News In Diavyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला धक्का:सावनेरमध्ये भाजपचे सोनबा मुसळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भातील सावनेरमधील भाजपचे उमदेवार सोनबा मुसळे यांची उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुसळे यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनबा मुसळे हे शासकीय कामांचे नोंदणीकृत कंत्राटदार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मुळे यांना निवडणूक लढवता येणार नसल्याचे सूत्रांन‍ी सांगिते.

सावनेर येथून काँग्रेसच्या सुनील केदार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. भाजपने मुसळे यांना केदार यांच्या विरोधात उभे केले आहे. परंतु मुसळे यांची उमेदवारी रद्द झाली तर कॉंग्रेस विरोधात उमेदवार नसल्याची नामुष्की भाजपवर ओढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.