नवी दिल्ली / मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक अर्ज भरण्याचीही सुरवात झाली आहे, मात्र अजूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागा वाटपावरुन सुरु असलेले युद्ध संपलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला शेवटचा फॉर्म्यूला दिला आहे. त्यांनी 25 वर्ष जुन्या सहकार्याला 119 तर सहकारी घटक पक्षांना 18 जागा सोडत स्वतः 151 जागांवर उमेदवार उभे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने नाकाराला आहे. शिवसेनेना कोणताही नवा प्रस्ताव दिला नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. शिवसेने दिलेल्या नव्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपने संसदीय समितीची बैठक बोलवली. एका मीडिया रिपोर्टनुसार, बैठकीत महाराष्ट्र भाजप नेत्यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष
अमित शहांसमोर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर, स्वतंत्र लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, भाजपला शिवसेनेचा फॉर्म्यूला अमान्य