आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर जवान सज्ज, मोदींना बोलण्याची गरज नाही; राजनाथ, शहा यांचा सोनियांवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आज राज्याच प्रचाराचा जोरदार धुराळा उडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा यांच्या राज्यात विविध ठिकाणी सभा झाल्या. राजनाथ सिंह यांनी सोलापूर आणि सांगलीत प्रचारसभा घेतल्या. तर अमित शहा यांनी वर्ध्यात मतदारांना भाजपला मत देण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले राजनाथ सिंह....
शेतकरी अथक परिश्रम करून पिकांच्या उत्पादनासाठी झटत असतात. पण त्याला पाहिजे तसा मोबदला तुम्हाला मिळत नाही याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच शेतक-यांना अधिकाधिक फायदा कसा होईल याचा विचार करून धोरणे आखणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. जनधन योजनेचेही त्यांनी गुणगाण गायले. बँकेत खाते खोलताच तुम्हाला एक लाखाचा विमा दिला जातो.
नरेंद्र मोदींनी कधीही अमेरिकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. पण देशातील लोकच अशी परिस्थिती निर्माण करतील की, मोदींना अमेरिकेला जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही हे आम्हाला माहिती होती.
सीमेवर शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत आहे. पाकिस्तानच खोडासाळपणा करून नेहमी असे कृत्य करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. मात्र सीमेवर आपले जवान त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देत अशल्याचे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. पंतप्रधान याविषयी काहीच का बोलत नाही, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. पण सीमेवरजे जवान पाकिस्तानला उत्तर द्यायाला पुरेसे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
पुढे वाचा, काय म्हणाले अमित शहा...