आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती सन्मानपूर्वक हवी, अमित शहांचे शिवसेनेला आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भाजप दोन पाऊल पुढे आली आहे. आता मित्रपक्षानेही दोन पाऊल पुढे यावे. युती सन्मानपूर्वक असली पाहिजे तरच कार्यकर्त्यांचे समाधान होईल, असे आवाहन भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला आज (गुरुवार) सकाळी कोल्हापूरात केले आहे. अमित शहा हे आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूरात दाखल झाले. शहांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर त्यांनी छोटेखानी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.
शहा म्हणाले, कोल्हापूर शहराशी माझे भावनिक नाते आहे. माझी पत्नी कोल्हापूरची आहे. त्याअर्थाने मी कोल्हापूरकरांचा जावई आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे मी कोल्हापूरातील अंबाबाईचे दर्शन घेऊनच प्रचाराला सुरुवात करणार आहे. यानंतर मी थेट चौंडी येथील पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाला जाणार आहे. तेथे सविस्तर भाष्य करीन. मात्र, कोल्हापूरातील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की, तुमच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार उलथून टाका.
पवारांवर व्यापारीकरणाचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने मागील 15 वर्षात 11 लाख 88 हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा पुनरुच्चार शहांनी कोल्हापूरच्या सभेतही केला. ते म्हणाले, 'या घोटाळ्याच्या पैशातून पाच-सहा वर्षे राज्य चालले असते. अशा भ्रष्ट सरकारला हटविण्याचे काम राज्यातील जनतेला करायचे आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. कार्यकर्त्यांनी त्यासाठी एकजूट होऊन तयारीला लागावे. काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून हटविले नाही तर काँग्रेस देशातून हद्दपार होणार नाही.' भाजप कार्यकर्त्यांना एकजूट होऊन लढण्याचे आवाहन करताना त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही टाळला.
शरद पवारांनी राजकारणाचे व्यापारीकरण केले अशी टीका करीत अमित शहांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. शरद पवारांनी सर्व गोष्टींचे व्यापारीकरण केले. राजकारणातही त्यांनी व्यापारीगट तयार करून आपली सत्ता राहील असे काम केले. हे व्यापारी राजकारण तुम्हाला नष्ट करावे लागेल असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या प्रचाराची सुरवात कोल्हापूरातूनच केली होती.

पुढील स्लाइडमध्ये,अमित शहांच्या भाषणातील ठळक मुद्दे