चाळीसगाव / जळगाव - राज्यातील काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने कोळी आणि वंजारी समाजवार अन्याय केला. त्यांना विकासापासून वंचित ठेवले. आता देशाचे पंतप्रधान मागास समाजातील आहेत, त्यांना गरीबांचे दुःख माहित आहे. आघाडी सरकारने महाराष्ट्राला घोटाळ्याचे राज्य केले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला.
ते म्हणाले, काँग्रेस आम्हाला साठ दिवसांचा हिशेब मागत आहे.
सोनिया गांधींना माझा सवाल आहे, तुमचे सरकार 15 वर्षांपासून राज्यात आहे. पहिले त्याचा हिशेब द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतान राज्यात शेतकरी आत्महत्या करत होते. असे सरकार तुम्हाला हवे आहे, का असा सवाल त्यांनी जनतेला केला.
अमित शाह यांचे स्वागत कोळी बांधवांनी त्यांची पारंपरिक टोपी घालून केले.