आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे साहेबांशिवाय भगवानगडावर यावे लागेल असे वाटले नव्हते, नियतीने अन्याय केला- पंकजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - कार्यक्रमातील पंकजा मुंडे यांचे छायाचित्र
अहमदनगर - दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर झालेल्या पहिल्याच विजयादशमी सोहळ्यात आपल्यात नसलेल्या नेत्याचे शब्द कानावर पडताच उपस्थितांच्या भावनांना बांध फुटला. भगवानगडावरील या कार्यक्रमात मुंडेंच्या येथील अखेरच्या भाषणाची ध्वनीफीत ऐकवण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले होते.
भगवानगडावर भाजपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनानंतर प्रथमच भगवानगडावर हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहा स्वेच्छेने याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर एकनाथ खडसे पंकजा पालवे मुंडे, प्रीतम खाडे-मुंडे यांचीही उपस्थिती होती. याठिकाणी होणा-या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यावर्षीही चांगलीच गर्दी जमली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीप्रमाणे गोंधळ होऊ नये म्हणून पंकजा पालवे यांनी आधीच सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.
कोण काय म्हणाले...
पंकजा पालवे-मुंडे
आज गडावर गर्दीही तेवढीच आहे, त्यांचा उत्साह देखिल तसा आहे. पण मला आज भगवान बाबांची समाधी काहीशी उदास वाटली. कारण मुंडे साहेब इथे नाही. मुंडे साहेबांशिवाय भगवान बाबांच्या दर्शनासाठी यावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते. मुंडे साहेबांच्या भाषणाशिवाय एकही दसरा येथे साजरा झाला नाही. जगाच्या कोणत्याही कोप-यातून मुंडेसाहेब याठिकाणी यायचे. येथे माझे लोक माझी वाट पाहतात त्यामुळे मला जायलाच हवे असे मुंडे साहेब म्हणायचे.
देवाने आपल्यावर अन्याय केला आहे. माझी लढाई थातूर-मातूर नेत्यांशी नाही. माझी लढाई त्या नियतीशी आहे जीने साहेबांना भरल्या ताटावरून नेले. साहेबांनी राज्यात युतीची सत्ता आणण्याची घोषणा केली होती. ते स्वप्न पूर्ण करत असल्याचा अभिमान मला आहे. राज्याची सत्ता आणून मी साहेबांचा गौरव करून दाखवेन. राज्यात बदल घडवून आणण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहील. मुंडे साहेबांना अग्नि देताना मी शपथ खाल्ली होती. मुंडे साहेबांचे नाव या जगाला विसरू देणार नाही. लोकांनी वामण व्हावे मी बळी होऊन बळीचे राज्य आणल्याशिवाय राहणार नाही.
अमित शहा
गरीब, वंचित दलित यांची चिंता गोपीनाथ मुंडेंएवढी कोणालाही नव्हती. त्यामुळेच त्यांच्याकडे एवढे महत्त्वाचे खाते देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पंकजाताईंचा फोन आला तेव्हा त्यांनी मला भगवानगडाच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली होती. त्यावेळी मी गोपीनाथरावांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी यायला आवडेल असे म्हटले होते. गोपीनाथरावांचे पूर्ण जीवन गरीबांना न्याय मिळवून देण्यात गेले. बीड ते दिल्ली संघर्ष यात्रेचाही तोच उद्देश होता.
तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा काय आहेत हे नेतृत्वाला माहिती आहे. त्यामुळे गोपीनाथरावांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंकजाताईंच्या नेतृत्वातच होईल हे मी सांगू इच्छितो. भगवानगडासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पंकजा यांनी आग्रह केला आहे, तर नरेंद्र मोदी भगवान गडावर सुवर्ण जयंती सोहळ्यासाठी नक्की येतील. गोपीनाथ मुंडेंनी ज्या ठिकाणाहून मागासांच्या कल्याणासाठी संघर्ष सुरू केला, त्या ठिकाणाला राज्यात महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी भाजप प्रयत्न करेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कार्यक्रमाचे फोटो...