(अक्षा कांबोज)
मुंबई- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मुख्य राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. यात भाजपचे सगळ्यात श्रीमंत उमेदवार मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कांबोज यांनी लक्ष वेधून घेतले आहे.
मोहित कंबोज हे दांडोशी मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. परंतु त्यांची पत्नी अक्षा कंबोज या देखील मागे नाहीत. अक्षा कंबोज या घर आणि बिझनेस सांभाळून पतीसाठी प्रचारकार्यात सहभागी झाल्या आहेत.
अक्षा या देखील अनेक कंपन्यांच्या संचालिका आहेत. अक्षा यांचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असून त्या स्वत: मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात.
सेलेब्रिटी क्रिकेट संघाची मालकीन आहे अक्षा...
अक्षा कंबोज या सेलेब्रिटी क्रिकेट लीगमधील संघ 'भोजपूरी दबंग्स' या संघाची मालकीन आहे. भोजपुरी गायक मनोज तिवारी हा 'भोजपूरी दबंग्स' संघाचा कर्णधार आहे. विशेष म्हणजे संघाची ब्रॅंड अॅम्बेसडर भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अक्षा कंबोज हिचे निवडक फोटो...