आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Speed Up In Campaign Where Are Congress Still In Maharashtra

भाजपचा प्रचाररथ सुसाट तर कॉंग्रेसचे डोळे दिग्गज \'सारथीं\'च्या सभांकडे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुका एका आठवड्यावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. भाजप, शिवसेना, मनसे आणि राष्‍ट्रवादीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. मात्र, त्या मानाने काँग्रेसचा प्रचाररथ काहीचा मागे पडल्याचे चित्र आहे. परंतु आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचारात उतरत आहे. दोन्ही दिग्गज नेते पक्षाचा प्रचाररथ किती वेगात पुढे नेतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

यंदा प्रथमच राज्यातील पाचही राजकीय पक्ष स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाची पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या लोकसभेत बहुतमत मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा उचावला आहे. त्यामुळे भाजपने प्रचार सभाचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे भाजपने स्टार प्रचारक म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात आणले आहे. मोदी राज्यात प्रचार सभा घेत आहेत. दिवसभरात मोदी किमान चार सभा घेताना दिसत आहेत. याशिवाय भाजपने अन्य राज्यातून दिग्गज नेते आयात केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्यात तळ ठोकून आहे. अमित शहा हेदेखील राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कॉंग्रेसचा प्रचाररथ पडला मागे...