आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती अभेद्यच! जागावाटपाबाबत मात्र तोडगा नाही, रात्रीच्या बैठकीत ठरणार फॉर्म्युला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यावेळी घेतलेले छायाचित्र.)
मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र लढणे गरजेचे असल्याने युती कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. जागावाटपासंदर्भात बैठकीत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी याबाबत माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले आहेत. रात्री यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचेही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
भाजपने घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली. मुंबईत भाजपचे निरीक्षक यांच्या उपस्थिती या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याने शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे जागावाटपाच्या चर्चेला उपस्थित होते. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला.

जागा वाटपाच्या मुद्यावरून 25 वर्षांपासूनच्या युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी भाजपने पुन्हा एकदा या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर भाजपने एक नवा प्रस्ताव सेनेला पाठवल्याचे सांगितले. शिवसेनेचा 119 जागांचा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसून, या विषयावर सन्मानजनक तोडगा निघावा असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले. शिवसेनेने आणि बाजपने कधीही न जिंकलेल्या जागांवर विचार व्हायला हवा असे भाजपचे म्हणणे आहे. दरम्यान भाजपने बैठकीनंतर एक नवा प्रस्ताव शिवसेनेकडे नव्याने प्रस्ताव पाठवल्याचे स्पष्ट केले.

भाजपने नवीन प्रस्ताव पाठवल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षांमध्ये नव्याने चर्चेची तयारी सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नसल्याने शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित होते. भाजपचे निरीक्षक ओम माथूर यांच्याबरोबर जागा वाटपाच्या या तिढ्याबाबत चर्चा झाली. त्यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुधीर मुनगंटीवार यांचीही बैठकीला उपस्थिती होती.
दरम्यान, जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रात्री बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर कोणता फॉ़र्म्युला आहे हे ठरणार आहे.