आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp State President Devendra Fadanvis Target To Shiv Sena News In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनताच ठरवेल खलनायक कोण? फडणवीसांचा शिवसेनेला टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘कुठल्याही टीकेला आम्हाला उत्तर द्यायचे नाही. त्यामुळे खलनायक नेमका कोण आहे, याचे उत्तर जनताच देईल,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेनेला लगावला. ‘राज्यात आमची खरी लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीत फूट पडल्यावर भाजपला खलनायक ठरवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. ‘भाजपपुढे भ्रष्ट सरकार दूर करण्याचे पहिले आव्हान आहे. त्यामुळे कोणत्याही टीकेला आम्हाला उत्तर द्यायचे नाही. त्यामुळे खलनायक कोण, हे जनताच ठरवणार आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘शिवसेनेला प्रतिस्पर्धी मानत नाही काय?’ या प्रश्नावर मात्र थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
भाजपने २५७ जागांवर, तर मित्रपक्षांनी ३१ जागांवर अर्ज दाखल केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १४, आठवले गटाला ८, जानकरांच्या रासपला ५, तर शिवसंग्रामला ४ जागा सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रामदास आठवले व रिपब्लिकन घटकांना सत्तेत १० टक्के भागीदारी देण्याचे आमचे आश्वासन असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अनिल गोटे यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यांना राजकीय कटात गुंतवण्यात आल्याचे ते म्हणाले.