आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Stop Kuthe Neun Thevala Maharashtra Campaign News In Divya Marathi

बंद होणार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्रची जाहिरात; सोशल नेटवर्कींगवर व्यक्त केली नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोशल नेटवर्कींग साईट्स आणि व्हॉट्स अपवर भाजपाच्या 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' या कॅम्पेनची चांगलीच खिल्ली उडवल्याने भाजपाने हे कॅम्पेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाकडून आता या जाहिराती ऐवजी नवी जाहिरात दाखवण्यात येणार आहे.
"अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" अशा आशयाच्या जाहिरातींचा मारा दिवसरात्र टीव्ही चॅनल, रेडीओ आणि सोशल नेटवर्कींगवरून होत होता. काँग्रेसवर टीका करणारी ही जाहिरात भाजपाला विधानसभा निवडणूकीत पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळवून देईल असे वाटत होते. मात्र झाले उलटेच. या जाहिरातीतून महाराष्ट्राला मागास असल्याचे सांगितले जात आहे असा आशय काढण्यात आल्याने सोशल नेटवर्कींग आणि व्हॉट्स अपवरून या जाहिरातीची टिंगल करणार्‍या अनेक पोस्ट पसरले आणि ही जाहिरात नसून ही महाराष्ट्राची बदनामी आहे असे सांगितले गेले. त्यामुळे सर्वच मराठी भाषीकांनी या जाहिरातीविरुध्द नाराजी व्यक्त केली.
निवडणूकीला केवळ आठ दिवस बाकी असताना भाजपाला त्यांची ही जाहिरात बंद करावी लागत आहे. लोकसभेत "अबकी बार...." हे कॅम्पेन यशस्वी ठरल्याने भाजपाला विधानसभेतही असेच एखादे कॅम्पेन असावे असे वाटू लागले. त्यामुळे काँग्रेसच्या "सर्वात पुढे महाराष्ट्र माझा" या कॅम्पेनच्या विरोधात भाजपाने कॅम्पेन सुरू करण्याचे ठरवले आणि त्यातून "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा" ही संकल्पना उदयास आली. मात्र ही शक्कल भाजपाला चांगलीच महागात पडली. खुद्द भाजपाच्या नेत्यांनीच या जाहिरातीमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, अशी टिंगल उडवली "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा"च्या जाहिरातीची