आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSP Chief Mayawati Maharashtra Election Rally At Nashik

भाजपचे एससी - एसटी आरक्षण बंद करण्याचे षडयंत्र, मायावतींचा नाशिकमध्ये आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराला नाशिकमधून सुरवात केली आहे. यात त्यांनी गरीबी आणि बेरोजगारी दूर करण्यात भाजप सरकार आणि त्याआधीचे काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस फक्त धनदांडग्यांसाठी काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सत्तेत आल्यानंतर गरीबी आणि बेरोजगारी दूर करण्याचा दावा केला होता, मात्र त्यांनी ते अजून पूर्ण केलेले नाही. मोजक्या धनाढ्यांसाठी भाजप आणि काँग्रेस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात जास्तित जास्त काळ काँग्रेसच्या हातात सत्ता होती, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा छळ केला आणि धनदांडग्यांसाठी काम केले. मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या कामाची उजळणी केली. भाजपने एससी, एसटी आरक्षण बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला. काँग्रेस, भाजप यांच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे.