आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसपाला प्रतीक्षा बंडखोरांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातीलसर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा करणार्‍या बहूजन समाज पक्षाच्या गोटात अजूनही शांतताच आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत संपत आली तरी अद्याप या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. इतर पक्षातून डावलण्यात आलेल्या बंडखोरांवर बसपाची सारी भिस्त असल्याचे सांगितले जाते. २००९ मध्ये बसपने राज्यात विधानसभेच्या २८१ जागा लढवल्या होत्या. लढवलेल्या जागांच्या तुलनेत या पक्षाला २.३४ टक्के मते मिळाली. मात्र, एकही जागा बसप निवडून आणू शकली नाही. "यावेळी बसपने २८८ जागांची तयारी केली असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे', अशी माहिती बसपचे राज्य अध्यक्ष विलास गरुड यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.