आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Campaign For Bjp Candidate Subhash Deshmukh In Solapur Constituency

भाजपच्या या नेत्याचा प्रचार करताहेत त्याचे चार हजार मुली-जावई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निवडणुकीचा प्रचार करताना भाजपचे नेते सुभाष देशमुख)

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवारांची धावपळ उडताना दिसत आहे. एका भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्याचे चार हजार मुली आणि जावई पुढे आले आहेत. सुभाष देशमुख असे या उमेदवाराचे नाव आहे. देशमुख हे सोलापूर (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

चार हजार मुली-जावई...
सुभाष देशमुख यांच्या प्रचारात पक्षांच्या कार्यकर्त्यांसह त्यांचे चार हजार मुली आणि त्यांचे पती सहभागी झाले आहेत. देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी 'लोकमंगल ग्रुप'ची स्थापना केली होती. या ग्रुपच्या माध्यमातून मागील वर्षी देशमुख यांनी दोन हजार मुलींचा सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे देशमुख यांनी या दोन हजार मुलींचे कन्यादान केले होते. त्यामुळे देशमुख या तरुणींना आपल्या मुली समजतात.

सुभाष देशमुख यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप माने निवडणूक लढवत आहेत. या दोघांमध्ये काट्याची लढत आहे.

प्रत्येक वर्षी सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन...
सुभाष देशमुख हे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सामुहिक विवाह समारंभाचे आयोजन केले जाते. नव दाम्पत्याला संसारोपयोगी वस्तु दिल्या जातात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सुभाष देशमुख यांच्या प्रचाराची फोटो...