आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidate Increse In District News In Divya Marathi

जिल्ह्यात आणखी ३२ हजार मतदार वाढले तर हजार नोंदणी अर्ज ठरले बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूरः निवडणूक आयोगाच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यात ३६ हजार १७७ जणांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये जिल्ह्यातील हजार ३२२ नोंदणी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. सर्वाधिक हजार ९६७ अर्ज दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये बाद करण्यात आले आहेत, तर माळशिरस उत्तरमधील प्राप्त सर्व नोंदणी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
राज्यात सर्वाधिक नोंदणीसाठी अर्ज सोलापूर जिल्ह्यातून आले होते. काही तालुक्यांत शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये खुद्द जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्येक नोंदणी अर्जाची कसून चौकशी करण्याचे आदेश सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील बीएलओंकडून चौकशी करण्यात आली.
नाव कमी करण्यासाठीचे ८५ अर्ज आले होते, त्यापैकी २३ अर्ज मंजूर तर ६२ अर्ज नामंजूर करण्यात आले. नावात दुरुस्तीसाठीचे हजार ४१४ अर्ज प्राप्त हाेते, त्यापैकी हजार १९२ अर्ज मंजूर तर २२२ अर्ज नामंजूर करण्यात आले. स्थलांतरसाठी १०६ अर्जापैकी ९७ अर्ज मंजूर करण्यात आले तर अर्ज नामंजूर करण्यात आले. ज्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहे त्यांना २९ सप्टेंबरपासून ओळखपत्र दिले जाणार असल्याचे निवडणूक कार्यालयांकडून सांगण्यात आले.