आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Candidate Nomination Starts In Ghatsthapana Muhurt News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दाखल होणार अर्ज; पितृपंधरवडा संपल्याने गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, भाजप-शिवसेना इतर मित्रपक्षांची महायुती यांच्या जागा वाटपाचा खल अद्याप सुरूच आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस असल्याने दोन्ही पक्षातील इच्छुकांचे धाबे दणाणलेत. पितृपंधरवडा असल्याने अनेकांनी अर्ज दाखल केले नाही. पण, गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याठी इच्छुकांची झुंबड उडणार आहे.
जिल्ह्यात अनेकांची सुरू आहे तयारी; फेरी, सभा मेळाव्यांचे आयोजन
महेश कोठे आज उमेदवारी दाखल करणार
शहरमध्य मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी महापौर महेश कोठे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी वाजता सातरस्ता येथून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. शक्तिप्रदर्शनाची तयारी कोठे समर्थक शहर शिवसेनातर्फे झालेली आहे.
चाकोतेंचाशुक्रवारी उमेदवारी अर्ज
शहरउत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असे गृहित धरून माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोंतम चौक शिवाजी चौक मार्गे त्यांची पदयात्रा निघणार आहे.
सपाटे शुक्रवारी दाखल करणार
शहरउत्तरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी महापौर मनोहर सपाटे गुरुवारी उमेदवारी दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता शिवाजी चौकातून त्यांची उमेदवारी पदयात्रा निघणार आहे.
प्रणिती शिंदेंचा शनिवारी उमेदवारी अर्ज
शहरमध्यच्या आमदार प्रणिती शिंदे शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता चार हुतात्मा पुतळ्यापासून त्यांची रॅली निघेल. त्याची तयारी शहर काँग्रेसकडून सुरू आहे.
दक्षिण सोलापूर : काँग्रेसपक्षाकडून आमदार दिलीप माने मनसेचे युवराज चुंबळकर उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर सुरेश हसापुरे शुक्रवारी भरणार आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे नाव स्पपष्ट झाले नाही. श्री. माने चार पुतळा येथून ११ वाजता पदयात्रा काढून अर्ज भरतील. चुंबळकर यांनीही तयारी केली आहे. हसापुरे शुक्रवारी सैफुल येथून शक्तिप्रदर्शन करत येणार आहेत. मिळाला तर पक्ष नाहीत अपक्ष म्हणत त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
अक्कलकोट: अक्कलकोटमतदार संघातून आमदार सिद्रामप्पा पाटील शुक्रवारी आणि माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे शनिवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पंढरपूर: समाधानआवताडे यांना शिवेसनेची उमेदवारी निश्चित असून येत्या २६ किंवा २७ तारखेला अर्ज दाखल करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. विठ्ठल आभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे देखील उमेदवारी नक्की असल्याचे सांगत आहेत. महायुतीमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बाहेर पडण्याबाबतच्या भूमिकेमुळे संघटनेत नुकताच प्रवेश केलेल्या प्रशांत परिचारक यांची मोठी अडचण झाली आहे.
सांगोला: सांगोलामतदारसंघात आरपीआयचे तालुकाध्यक्ष सूरज बनसोडे, शिवसेनेचे शहाजी पाटील अपक्ष भाजपकडून इच्छुक संभाजी आलदर २५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणार आहेत . आमदार गणपतराव देशमुख आणि काँग्रेसचे जगदीश बाबर २६ सप्टेंबरला अर्ज भरणार आहेत.
मंगळवेढा: पंढरपूरसाठीआमदार भारत भालके काँग्रेसकडून उद्या गुरुवारी अर्ज दाखल करतील.
करमाळा: रश्मीबागल, संजय शिंदे २६ सप्टेंबर तर जयवंतराव जगताप २७ सप्टेंबर आणि महेश चिवटे २५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणार आहेत.
माढा: गणपतउर्फ दादासाहेब साठे २५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणार आहेत.
माळशिरस: शेतकरीसंघटनेचे उत्तम जानकर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बार्शी: माजीआमदार राजेंद्र राऊत २६ स्पटेंबरला अर्ज भरणार आहेत. तशी तयारी त्यांनी केली आहे.
नाराज गटातील नगरसेवकांनी भरले अर्ज, तयारी जोरात
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याविषयी नियोजन करण्यासाठी शहर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी घेण्यात आली.
पक्षाच्या काही नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. त्याबाबत शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, पक्षाकडून अधिकृत माहिती नाही. त्यांना पक्षाने भरण्यास सांगितले असेल तर मला माहीत नाही. पक्षाने ज्याचे नावे जाहीर करेल त्यांचा अर्ज दाखल करण्यात येईल. त्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली.