आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांनी पृथ्वीराज चव्हाणांचा राजीनामा स्विकारला, आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शुक्रावीर पदाचा राजीनामा दिला होता. आज (शनिवार) राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांच्या राजीनामा स्विकारला असून विधानसभेचे निकाल लागेपर्यंत चव्हाण काळजीवाहू मुख्यमंत्री राहाणार आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी चव्हाणांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची शक्यता फेटाळली गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशी तडकाफडकी आघाडी सोडली होती. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी सत्ता सोडू शकते तर, आम्हालाही सत्तेची हाव नाही, असे दाखवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याचे विरोधकांनी म्हटले होते.
आघाडी तोडत असल्याचे सांगत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी सर्वस्वी पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरले होते. जागावाटपासाठी त्यांनी चर्चेचा प्रस्तावच दिला नसल्यामुळे किती वेळ वाट पाहाणार, असे सांगून अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा स्वबळावर लढेल असे म्हटले होते.
दुसरीकडे, समाजवादी पार्टीनेही काँग्रेसची साथ सोडली आहे. जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सुटला नसल्याने स्वतंत्र लढणार असल्याचे अबु आझमी यांनी सांगितले आहे.