आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Combing Operation In Election Ews In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमकार्ड तपासणी, कोम्बिंग ऑपरेशनद्वारे राहणार लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी सुरू आहे. संशयास्पद वाटणारे मोबाइलचे सीमकार्ड, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, कोम्बिंग ऑपेरशन याद्वारे तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पहाटे अथवा मध्यरात्रीच्या सुमाराला एटीएम सेंटरजवळ कुणी संशयितरीत्या फिरत असल्यास त्यांचीही चौकशी पोलिसांकडून होत आहे. सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाकडून पेट्रोलिंग, नाकाबंदी तपासणी आहे. कुणाच्या घरी भाडेकरू आहेत, हॉटेल, लॉजची तपासणी, अवैध प्रवासी वाहतूक, हातभट्टी दारू अड्डे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक काळात शांतता प्रस्थािपत राहण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
निवडणूक सेल कार्यान्वित
पोलिसआयुक्तालयात निवडणूक सेल चोवीस तास सुरू आहे. निवडणूक आयोग, पोलिस महासंचालक कार्यालयात माहिती देण्या-घेण्याचे काम सुरू असते. मोठी राजकीय सभा, रॅलीसाठी परवानगी देण्याची जबाबदारी या कक्षाकडे आहे. राजकीय नेत्यांचे दौरे, निवडणूक बंदोबस्ताची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांनी दिली.
हॉटेल, लॉजची होणार तपासणी
पोलिसांनीसीमकार्डची तपासणी मोहीम हाती घेतली. कुणाच्या तरी नावे सीम घेऊन कुणी वापरत असेल तर त्यांना थेट मोबाइल लावून माहिती जाणून घेत आहेत. सीमकार्डच्या माध्यमातून गैरवापर होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात येत असल्याची माहिती, साहाय्यक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घागरे यांनी दिली. याशिवाय हॉटेल, लॉजमध्ये कुणी संशयित येऊन राहिले आहेत का, याचीही खातरजमा करण्यासाठी सर्च मोहीम आहे.
गावठी दारू पकडली
सोलापूरतांदूळवाडी पुलावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गावठी दारू वाहून नेताना ट्रक पडला. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. ट्रक (एमएच 13 आर 3276) मधून हातभट्टी दारू शहरात आणताना पोलिस अधीक्षक सागर धोमकर, निरीक्षक राहुल बांगर, संजय नवले, अलीम शेख, मलंग तांबोळी, राजेंद्रसिंह ठाकूर या पथकाने सापळा रचून पकडली. ट्रकही जप्त करण्यात आला आहे. चालक मात्र गायब झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.