महाराष्ट्रासह देशात पूर्वी सिद्धांतावर राजकारण केले जात होते. आता मात्र, प्रत्येक पक्ष सत्ताकेंद्रीत राजकारण करत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उल्लेखनिय म्हणजे इतिहासात पहिल्यादाच पाच मुख्य राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचा समावेश आहे.
पाचही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करणार्या नेत्यांची यादी मोठी आहे. जणू सगळ्यांनाच मुख्यमंत्रिपदाची 'खुर्ची' हवी आहे, अशी स्थिती जवळपास सगळ्याच पक्षात आहे. या तुलनेत आमच्या पक्षात स्पर्धा कमी असल्याचा दावा भाजप नेते करत असले तरी तीन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत असणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली, तर मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने भाजपने शिवसेनेशी असलेले 25 वर्षांचे नाते एका झटक्यात तोडले. त्यामुळे यंदा राज्यात होणारी विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. त्यात मतदारराजा कोणाच्या बाजूने कौल देतो, कोणत्या पक्षाच्या सक्षम नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी देतो. हे पाहाने औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधील या तीन नेत्यांमध्ये सुरु आहे रस्सीखेच...