आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार अंबानगरीतून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानसभानविडणुकीचा बिगुल वाजला असून काँग्रेसच्या पश्चमि विदर्भाच्या प्रचाराचा नारळ सोमवारी अंबानगरीतून फुटणार आहे. मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात दुपारी एक ते तीनच्या सुमारास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याला विधानसभा नविडणुकीचे प्रचारप्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री मुकुल वासनिक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थति राहणार अाहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भातील प्रचाराचा मान हा अमरावतीला असतो. नविडणुकीच्या प्रचाराची सुरुवात अमरावतीमधून करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम विदर्भासाठी होणाऱ्या या मेळाव्यात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम बुलडाणा जिल्ह्यांतील माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, ज्येष्ठ नेते उपस्थति राहतील. सोबतच काँग्रेसचे इतर मंत्रीदेखील सभेत उपस्थति राहणार आहे,असे त्यांनी सांगितले.