आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मरा‌ठवाड्यात सोनिया किंवा राहुल यांची एकच सभा, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राणेंच्या सभांना मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी एक जण राज्यात प्रत्येक विभागात एकच सभा घेणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यात एक तर सोनिया गांधी येतील किंवा राहुल यांची एकच सभा होण्याची शक्यता आहे. सभांचे नियोजन सुरू करण्यात आले असून राज्यपातळीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सभांना मागणी आहे, अशी माहिती असल्याचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी म्हटले आहे.
उद्या (मंगळवार) तुळजापूर येथे पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येत असून तेथे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून राज्यातील सर्व नेते उपस्थित राहतील. त्यानंतर ठिकठिकाणी सभा होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र याचा अंतिम आराखडा अजून तयार नसल्याचेही सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांची औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तरीही त्यांचा येथील उमेदवार पराभूत झाला होता. त्यामुळे या वेळी सोनिया गांधींची सभा येथे होऊ शकते. परंतु त्याचे नियोजन अजून झालेले नाही. शहराचा विचार करता शहरातील तिन्ही मतदारसंघांतून उमेदवारांनी अजून सभांची मागणी केलेली नाही. कन्नड मतदारसंघातून नामदेव पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व नारायण राणे यांची सभा व्हावी, अशी गळ घातली आहे. त्यावर विचार होणार असून लवकरच त्यांचा दौरा निश्चित केला जाणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील काँग्रेस उमेदवारांनी नेत्यांच्या सभांची मागणी केली. त्यात अशोक चव्हाण यांच्या सभांना सर्वत्र मागणी असल्याचे समोर आले आहे. ते जिल्ह्यातील किमान पाच मतदारसंघांत सभा घेतील, अशी शक्यता आहे.