आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress President Sonia Gandhi Rally At Gondia, Maharashtra

\'भाजपला सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही, मोदींचा अमेरिका दौरा परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया - भाजपने सत्तेत आल्यानंतर गोरगरीब, सर्वसामान्यांच्या विरोधातील निर्णय घेण्यास सुरवात केली आहे, शिवसेना - भाजपच्या भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
मोदींच्या अमेरिका दौर्‍यावर टीका करताना त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले. त्यांच्या अमेरिका दौर्‍याने देशातील कोणला फायदा झाला हे नंतर कळेलच पण सध्या तरी देशातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील औषध कंपन्यांच्या फायद्यासाठी त्यांनी जीवनरक्षक औषधांच्या किंमती भरमसाठ वाढवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कॅन्सर, मधुमेह यासारख्या रोगांवरील औषधांच्या किंमती लाखो रुपयांच्या घरात गेल्या आहेत.' केंद्रीतील मोदी सरकारला सर्वसामान्यांची फिकीर नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.
काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षात राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधला असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या विकासासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला. यूपीएच्या काळात आदिवासींसाठी केलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.