कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आजपासून कॉंग्रेसच्या प्रचाराला सुरवात केली. त्यांनी प्रामुख्याने
नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी मात्र त्यांच्याकडून नकळत झालेल्या चुकीची खरमरीत चर्चा रंगली. राहुल गांधी यांनी भाषण करताना नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख विरोध पक्षनेते असा केला. यामुळे राहुल गांधी यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते, की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये झालेल्या सभेत भाषणाच्या ओघात राहुल गांधी म्हणाले, की गेल्या 60 वर्षांत काहीच विकास झाला नाही असा आरोप विरोध पक्षनेते करीत आहेत. कॉंग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा विरोधी पक्षनेत्यांकडून केली जात आहे.
या वाक्यानंतर राहुल गांधी यांच्या लक्षात ही चुक आली. त्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणत विषय बदलला. पण सध्या सर्वच सभा लाईव्ह दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली.