आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepshikha Deshmukh And Dheeraj Deshmukh Campaigning

जेनेलियाच्या छोट्या जाऊबाईंचेही आहे बॉलीवूड कनेक्शन पाहा, PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी दीपशिखाबरोबर धीरज देशमुख)

मुंबई - बॉलीवूड आणि राजकारणाचे नाते अत्यंत जुने आहे. अनेक अभिनेत्र्यांचा विवाह राजकीय कुटुंबामध्ये झाला आहे. तर अनेक अभिनेत्यांच्या बहिणीही राजकीय कुटुबांमध्ये सुना बनून गेल्या आहेत. आज अशा एका सुनेबाबत माहिती देत आहोत. ही आहे अभिनेता जॅकी भगनानी यांची बहीण दीपशिखा. तिचा विवाह माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख यांचे लहान भाऊ धीरजबरोबर झाला आहे.

सध्या धीरज आणि त्याची पत्नी दीपशिखा दोघेही मोठा भाऊ अमित देशमुख याच्या प्रचारात व्यस्त आहेत. अमित लातूरच्या बाभूळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही दिवसांपूर्वी धीरज हेही निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण मोठा भाऊ मैदानात असल्याने त्यांनी हा निर्णय बदलला होता.

रितेश आणि जेनेलिया आहेत मोठा दीर व जाऊ
बॉलीवूड अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया दीपशिखाचे मोठे दीर आणि जाऊ आहेत. विशेष म्हणजे धीरज आणि दीपशिखा यांनी रितेश आणि जेनेलिया यांच्या लग्नानंतर काही दिवसांतच विवाह केला होता.

मोठी जाऊही अभिनेत्री
धीरजचा सर्वात मोठा भाऊ आणि काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या पत्नी आदिती देसमुख याही अभिनेत्री होत्या. अनेक टीव्ही वाहिन्यांवरही त्यांनी कामे केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO