आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don Arun Gawli Daughter Poorest Candidate In Maharahstra Assembly

या उमेदवाराचे वडील अंडरवर्ल्ड \'डॉन\' तर नवरा बिल्डर, तरीही ही आहे सर्वात गरीब उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गीता गवळी आपल्या मतदार संघात प्रचारादरम्यान एका वेगळ्याच अंदाजात दिसल्या)

मुंबई
- नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये सर्वात गरीब उमेदवारांच्या यादीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी यांची लहान मुलगी गीता गवळी यांच्या नावाचा समावेश आहे. उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार गीता यांनी आपली संपत्ती 1.29 कोटी सांगितली आहे. ज्यामुळे त्या सर्वात गरीब उमेदवाराच्या यादीत दुसर्‍या स्थानावर आहेत. गीता भायखाला विधानसभा मतदार संघातून त्यांच्या वडीलांचा पक्ष अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढणार आहे. या यादीत सर्वात पुढे कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ इंडिया (सीपीआई) चे उमेदवार नारायण आहेत. त्यांनी मुंबईच्या अंधेरी (वेस्ट) मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.


दोन वेळा जिंकली नगरसेवकची निवडणूक
डॉन अरूण गवळी यांनी सुरू केलेली अखिल भारतीय सेना पार्टीकडून गीता दोनवेळा नगरसेवक बनल्या आहेत. या दोन्ही निवडणूकींमध्ये गीता यांचा चांगल्या मतांनी विजय झाला आहे. सध्या त्या मुंबई महानगर पालिकेतील एक नगरसेवक आहेत. डॉनची मुलगी तसेच तळागाळातील लोकांशी संपर्क असल्यामुळे त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे.
डॉन अरुण गवळीनेसुध्दा लढली निवडणूक
डॉन अरूण गवळीने अखिल भारतीय सेना पार्टीकडून 2004 मध्ये चिंचपोकळी या मतदार संघातून निवडणूक लढली होती. या निवडणूकीत त्यांना हजारो मतांचा फरकाने विजय मिळाला होता. आमदार बनल्यानंतर काही दिवसातच अरूण गवळीवर मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या अरुण गवळी मुंबईतील तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.

भायखाळा विधानसभा मतदार संघातून देणार काँग्रेसला टक्कर
सध्या भायखाळा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार मधु चव्हाण यांच्या विरोधात गीता निवडणूक लढत आहे. या भागात अरुण गवळी यांचे घर 'दगडी चाळ' येथे आहे. यामुळे येथे गिता यांना चांगली लोकप्रियता मिळत आहे.

सर्वोत्कृष्ट नगरसेवकाचा पुरस्कार प्राप्त
गीता यांना दोनवेळा सर्वोत्कृष्ट नगरसेवकाचा बहूमान मिळाला आहे. सतत विकासकार्य करण्यासाठी त्यांना 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट नगरसेवकाचा पुरस्कार देण्यात आला.
गीताचे पती आहेत बिल्डर
2007 मध्ये गीताने मुंबईचे प्रसिध्द बिल्डर अजय गवळी यांच्याशी विवाह केला. हे लग्न एवढे चर्चेत ठरले की, या लग्न टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात आले. तसेच या लग्नात अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईडवर पाहा, गीता गवळी यांच्या प्रचार सभेचे फोटो...