आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EC Issues Show Cause Notice To Union Minister Nitin Gadkari For Alleged Violation Of Model Code Of Conduct.

आचारसंहिता भंग प्रकरणी नितीन गडकरींना निवडणूक आयोगाची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. गडकरींनी जाहीर सभेतून मतदारांना पैसे घेण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेत आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनेही गडकरींवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना, तुमच्या मंत्र्यांनी पैसे घेण्याचे मतदारांना आवाहन केले आहे. हा भ्रष्टाचार नाही का, असा सवाल केला आहे.

काय म्हणाले होते गडकरी
कायखायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे. 'लक्ष्मीपूजना'अगोदरच 'लक्ष्मी'दर्शनाचा योग आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने भ्रष्टाचारातून पैसा कमवला जमवला असल्याने ते धन जरूर घ्या. असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी निलंगा येथील सभेत केले होते.