जळगाव- जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समजले जाणारे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात थेट राजकीय लढत होण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघातून संतोष चौधरींच्या पत्नी रेखा चौधरी राष्ट्रवादीच्या उमेदवार होण्याची शक्यता आहे. पक्षाकडून तशी चाचपणी सुरू आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या विरोधात उमेदवार देण्यावरून राष्ट्रवादीत खल सुरू आहे. अॅड.रवींद्र पाटील, विनोद तराळ, अतुल युवराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या एकनाथ खडसेंना थांबवण्यासाठी राष्ट्रवादीला सक्षम उमेदवाराचा शोध आहे. अॅड.पाटील या वेळी फारसे उत्सुक नसल्याने पर्यायी उमेदवाराचा राष्ट्रवादी शोध घेत आहे. माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसे यांचे जुने राजकीय शत्रुत्व आहे. त्यामुळे तेथून लढण्यास त्यांची तयारी आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील पक्षाकडे चौधरींच्या नावाचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर चौधरींकडून रेखा चौधरी यांचे नाव पुढे आले आहे.
लढण्याची तयारी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून लढण्याची आमची तयारी आहे. मात्र, कार्यकर्त्यांची मागणी मुक्ताईनगरमधून लढण्याची आहे. येत्या काळात आणखी काही बदल होणार आहेत.
-संतोष चौधरी, माजी आमदार, भुसावळ
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अनिल चौधरींकडे लक्ष...