(फोटो - सर्व छायाचित्रे आणि मेसेज विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार )
सोशल मीडियाने अल्पावधीत अबालवृद्धांना भूरळ पाडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदामध्ये संवाद साधणे, माहिती आणि विचारांची देवाण-घेवाण करणे अगदी सहज शक्य झाले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून एक हाती सत्ता मिळवली.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकी रणधुमाळी सुरु झाली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आता राज्यपातळीवरही सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास सर्वच पक्ष प्रचारमोहिम राबवताना दिसत आहे. शिवसेना- भाजपची युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील आघाडी बिघाडी झाल्यानंतर मतदारराजा कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या 'फेसबुक', 'ट्विटर', 'वॉट्सअप'वर भरपूर मनोरंजन करणारे मेसेजेस आणि मजेशिर फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, काय सुरु आहे सध्या सोशल मीडियावर