आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Ink, EVM And Identity Card Use In Election

MH Election: जाणून घ्या, निवडणुकीची शाई, EVM आणि ओळखपत्राबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात तयार होणारी निवडणुकीची शाई 28 देशांत निर्यात होते. 2012 मध्ये या शाईच्या निर्यातीतून शाई उत्पादक कंपनीने चार कोटी रुपये कमावले.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोटावरील शाई पुसून दोन वेळा मतदान करण्याचा अजब सल्ला दिला होता, पण असे करता येणे शक्य नाही, असा शाई उत्पादक कंपनीचा दावा होता.

कोण आहेत शाईचे उत्पादक ?
देशात निवडणुकीची शाई फक्त म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) कंपनी तयार करते. कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील ही कंपनी 1962 पासून निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार शाई तयार करते. निवडणुकीच्या शाईची खुल्या बाजारात विक्री होत नाही.

कशी तयार होते?
इनडेलिबल इंकमध्ये स्प्रिंट आणि सिल्व्हर नायट्रेट मिसळले जाते. जांभळ्या रंगाची फोटो सेन्सेटिव्ह स्वरूपाची ही शाई आहे. जी प्रकाशाच्या संपर्कात येताच गडद होते. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत याचे उत्पादन केले जाते.

14,000 रुपये प्रतिलिटर
व्हॅट आणि एक्साइज ड्यूटीशिवाय 10 मिलीच्या बाटलीची किंमत 141 रुपये एवढी आहे. म्हणजे एक लिटर शाईसाठी 14 हजार रुपये मोजावे लागतात. 10 एमएल शाईने 500 लोकांच्या बोटांवर खूण करता येते.

3000 शाईच्या बाटल्या एका आठवड्याच्या आत म्हैसूर पेंट्सने पूर्वी तिमोर या देशाला 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी पाठवल्या होत्या. कमी वेळेत कंपनीने डिलिव्हरी केलेली ही सर्वात मोठी ऑर्डर होती.

पुढील स्लाईडवर वाचा मतदान यंत्राविषयी.....मतदानासाठी लागणाऱ्या ओळखपत्राविषयी...