आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Implementation Of Election Management In Maharashtra Poll

ANALYSIS: जो राबवेल Election Management त्याचेच होईल सहज Selection

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी Election Management हा शब्द फारसा कुणाला माहित नव्हता. निवडणुका लढायच्या, रणनिती आखायच्या आणि त्या जिंकायच्या एवढाच काय तो विचार केला जात होता. पण गेल्या लोकसभा निवडणुकांनी भारतीय निवडणुकांचा चेहरा-मोहरा बदललाय. अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या निवडणुका लढण्यात आल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. युती आणि आघाडी तुटली असल्याने चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी जिंकून येण्यासाठी Election Management अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जो उमेदवार Election Management मध्ये सरस ठरेल त्याच्याच गळ्यात विजयी माळ पडणार आहे. इतरांना मागे पछाडून तोच निर्विवाद वर्चस्व गाजवणारा ठरणार आहे. पण हे Election Management म्हणजे आहे तरी काय, ते कसे राबवले जाते, जाणून घेऊयात...
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी 71 जागा भाजपने जिंकल्या. काही राज्यांत कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात कॉंग्रेस अगदी काठावर राहिली. काही उमेदवार निवडून येऊ शकतील असे जराही वाटत नव्हते, असे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत मोदी लाट होती, असे सांगितले जाते. पण मोदी लाट अपोआप तयार झाली नव्हती. ती तयार करण्यात आली होती. त्यासाठी Election Management चा अगदी बारकाईने वापर करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून घवघवीत यश मिळवण्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे Election Management सरस ठरल्याचे सांगितले जाते. पण शहा यांनी केले तरी काय, त्यांनी पारंपरिक राजकारणात कसे बदल केले, कशी व्यवस्था करुन जागा जिंकल्या हे निश्चितच बघण्यासारखे आहे. समजून घेण्यासारखे आहे. यातूनच सत्तेची गणिते सोपी होणार आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कसे असावे Election Management....निवडणुकीत कसे यावे निवडून... Election Management राबवणारा उमेदवारच कसा राहणार सरस...