आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Whatsapp - खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसात असलेल्या अनेक वर्षांच्या युतींना तिलांजली देऊन "एकला चलो रे'ची वाट धरली आहे. हिंमत असेल तर निवडणुकीनंतर एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर या पक्षांनी आपली हीच भूमिका कायम ठेवावी. भाजप-शिवसेनेने भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवावे. तर कॉंग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तथाकथित जातीयवाद्यांना आणि सांप्रदायिकतेला सत्ता मिळू नये म्हणून प्रयत्न करावेत. पण काही झाले तरी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात गळे घालणार नाही, असे या चारही पक्षांच्या अध्यक्षांनी १०० रुपयांच्या बाँड पेपरवर सह्या करून निवडणूक आयोगाला, राज्यपालांना, राष्ट्रपतींना आणि सर्वोच्च न्यायालयाला लिहून द्यावे. कारण यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. हे जनता पुरती ओळखून आहे, असा सूर नेटिझन्सकडून व्यक्त होतो आहे.
एकाने हाच सूर पकडून म्हटले, निकालानंतर राज्यात पुणे पॅटर्न (भाजप + राष्ट्रवादी) येणार. कर्नाटकात देवेगोडाशी हात मिळवणाऱ्या भाजपचा काय विश्वास? दिल्लीत भाजपला आपण निवडले कारण समोर राहुल गांधी होते. पण लोकसभा विधानसभ या दोन्ही निवडणुकांमध्ये फरक आहे. आता अधिक विचारपूर्वकच मतदान केले पाहिजे.
एका नेटिझन्सने म्हटले, महाराष्ट्रात आता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत देऊन जनतेने निवडून द्यावे. स्वार्थावर, सौदेबाजीवर, सत्तापिपासूपणावर आणि वैयक्तिक फायद्यांवर अवलंबून असलेल्या अनेक युती सरकारांचे प्रताप आपण आतापर्यंत बघितले आहेत. आता केवळ एकच पक्ष आणि स्पष्ट बहुमत हे जनतेचे ध्येय असले पाहिजे.
एका नेटिझन्सने तर गीतासार सांगून या राजकीय नाट्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले. तो म्हणाला, झालं ते चांगलच, होत आहे आणि होणार तेही चांगलच. रडू नकोस. तुझ्यासाठी काही नव्हतचं. त्यांचंच (राजकारण्यांच) या हातातून त्या हातात होत आहे. हा परिवर्तनचा खेळ बघत राहणं एवढच तुझ्या नशिबात आहे.....गीतासार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यावरही नेटिझन्सने विश्लेषण केले. एकजण म्हणाला, राष्ट्रपती राजवटीऐवजी दुसरा पर्याय होता… पुढचे सरकार येईपर्यंत पृथ्वीराज चव्हाण काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकले असते पण राज्यपालांनी तसे होऊ दिले नाही. यासाठीच मोदींनी आपल्या मर्जीतले राज्यपाल आणून ठेवले. एक महिन्यापूर्वीच… सगळे आधीच ठरले होते… भाजपने युती तोडायची आणि राष्ट्रवादी ने लगेच सरकार पाडायचे… मग राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करणार… म्हणजे मुंबईवर दिल्लीची आणि पर्यायाने मोदी आणि अमित शहांची गुजराती सत्ता… मराठी माणसा जागा हो, आता त्रिशंकू विधानसभा होऊ देऊ नका… अन्यथा राष्ट्रपती राजवट चालूच राहील… महाराष्ट्र अस्थिर करून विदर्भ आणि मुंबई तोडायचा डाव यशस्वी होऊ देऊ नका…. जयतु अखंड महाराष्ट्र…!!!!
एकूणच राष्ट्रपती राजवटी, राजकीय कुरघोडी यांच्यावरील टीका टीपण्णी संपणारी आहे, जोपर्यंत या निवडणुकीतून नवे सरकार येत नाही.