आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा - निवडणूक आयोगाकडून ८५ चिन्हांची यादी जाहीर; गाजर, नारळ, शिटी, सोबती ढोल, काठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष वगळता अपक्षांसाठी ८५ निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरिता आठ चिन्हे राखीव आहेत. सर्व अपक्षांसाठी खुल्या असलेल्यांमध्ये गाजर, नारळ, हिरवी मिरची, शिटी, चपला, ढोल, टोपी, काठी आदी चिन्हांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या १५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यापूर्वी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येईल अाणि ३० सप्टेंबरला अपक्ष उमेदवारांना अपक्ष चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. शनिवारपासून निवडणुक प्रक्रियेस प्रारंभ झाला.

राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार अजून निश्चित झालेले नसले तरी अनेकांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना कोणते चिन्हे द्यायचे हे आयोगाने स्पष्ट केले आहे. ८५ मुक्त चिन्हेही जारी करण्यात आले. प्रमुख राजकीय पक्षांना सात चिन्हे अधिकृत आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचे धनुष्यबाण, काँग्रेसचा हात, राष्ट्रवादीचे घड्याळ, मनसेचे रेल्वे इंजिन, बसपासाठी हत्ती, भाजपसाठी कमळ आणि सीपीआयचे विळा-कणीस या चिन्हांचा समावेश आहे.
अशी आहेत चिन्हे
मेणबत्ती,कपाट,एअर कंडिशनर, ऑटोरिक्षा, फुगा, फळांची टोपली, बॅट, फलंदाज, बॅटरी, बेल्ट, फळा, बाटली, पाव, ब्रिफकेस, ब्रश, बादली, केक, कॅलेंडर, कॅमेरा, कॅरम बोर्ड, गालीचा, गाजर, फुलकोबी, फॅन, चपला, बुद्धिबळ पट, जॅकेट, नारळ, खाट, कपबशी, डिझेल पंप, डिश अँटेना, डोली, लिफाफा, बासरी, झगा, कडई, नरसाळे, गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, द्राक्ष, हिरवी मिरची, हॅट, हेल्मेट, हॉकी आणि बॉल, आइस्क्रीम, इस्त्री, चहाची किटली, पतंग, लेडिज पर्स, पत्रपेटी, मिक्सर, पाटी, स्टूल, टेबल, करवत, कात्री, शिलाई मशीन, टीव्ही, टेलिफोन, टूथ ब्रश, गिटार, शिटी, खिडकी, टाय, नेलकटर, प्रेशर कुकर, रेझर, अंगठी, टेबल लॅम्प आदींचा समावेश आहे.