आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election2014 Maharashtra Politician Family Relation Information

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा, मराठी राजकारण्यांचे एकमेकांसोबतचे नातेसंबंध, काका-पुतण्यांचा राहिला वरचष्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रस्थापित घराणे आहेत. त्यामुळे काका-पुतण्या, वडील-मुलगा, वडील-मुलगी अशा नात्यांभोवती महाराष्‍ट्राचे राजकारण फिरतांना दिसते. पवार आणि ठाकरे या दोन्ही घराण्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे विशेष लक्ष असते.
पूर्वी राजकीय नेत्यांचा राजकीय वारसादार म्हणून त्यांच्या मुलांकडे पाहिले जात होते. मुलगा नसेल तर पुतण्या अथवा भाचा नेत्यांचा राजकीय वारसा चालवत होता. परंतु काळ बदलला, माणसे बदलली, त्यामुळे आता राजकीय वारसदार म्हणून मुली पुढे सरसावल्याचे दिसते.

आधुनिक महाराष्ट्राचा जलद गतीने आणि सर्वांगीण विकास साधणारे राजकीय नेते शरद पवार यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणी घराण्यातील अनेक पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. शरद पवार यांना राजकारण व समाजकारणाचे बाळकडू त्यांच्या आई शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले असे म्हणतात. शारदाबाई या स्वातंत्र्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या.

आता महाराष्ट्रासह देशाचे राजकारण हालवून सोडणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याची तिसरी पिढी राजकारणात येत असल्याचे चित्र आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ यानेही आता राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 2006 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. सुप्रिया सुळे पहिल्यादा राज्यसभेवर महाराष्‍ट्रातून बिनविरोध निवडून आला होत्या.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांमधील नातेसंबंध आणि वारसदार...

(फोटो: शरद पवार- अतित पवार- सुप्रिया सुळे)