आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या कामांचे मूल्यमापन: तीर्थस्थळांचा विकास, रस्ते, पाणीप्रश्न सोडवला - अनिल देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल देशमुख (राष्ट्रवादी, काटोल जि. नागपूर)
स्थानिक विकासनिधीचे मूल्यमापन
१. पाच वर्षांत दरवर्षी खर्च झालेला निधी १० कोटी
विकास निधीतून झालेल्या कामांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, यात्री निवास, समाजमंदिर, ग्रामपंचायत भवन बांधकाम, स्मशानभूमी बांधकाम, बसस्थानक बांधकाम अशा अनेक कामांवर निधी खर्च केला आहे.

खेचून आणलेली विकासकामे
* नरखेड तालुक्यातील भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता या परिसरात महत्त्वाकांक्षी मदार नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नदीकाठी वसलेल्या आठ गावांत नारसिंगी ते मोहदी दळवी या गावापर्यंत मदार नदीवर १६ कोटी खर्च करून १५ बंधारे बांधण्यात येतील. यामुळे २३ किमींची नदी जिवंत होणार आहे.
* स्थानिक विकास निधीतून काटोल, नरखेड व नागपूर ग्रामीण तालुक्यातील ३१ धार्मिक स्थळांचा विकास व्हावा म्हणून ही तीर्थक्षेत्रे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करून घेतली आणि तिथे रस्ते, वाहनतळ, पिण्याचे पाणी, यात्री निवास, भक्त निवास आदी सोयी-सुविधा करून दिल्या. दलित वस्ती सुधार योजनेत रस्ते, समाजमंदिर यासाठी २४ कोटी, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजनेंतर्गत १७ कोटी, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकामासाठी ५ कोटी खर्च केले. कोंढाळी बसस्थानकाच्या बांधकामासाठी ५४ लाखांचा निधी मंजूर करून दिला.
* १९९१ मध्ये वर्धा नदीला आलेल्या पुरात मोवाड गाव वाहून गेले. मोवाडसह इतर १२ पुनर्वसित गावातील घरांवरील १४.७५ कोटींचे कर्ज व व्याज मंत्रिमंडळाकडे विषय लावून धरीत माफ केले. रस्ते व पुलांची एकूण ४७७ कोटींची कामे मंजूर केली. काटोल ट्रॉमा केअर सेंटरसाठी १ कोटी ४१ लाख मंजूर करण्यात आले.